मुक्ताईनगरात शिवसेनेत ‘इनकमींग’ : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून तालुक्यातील हिवरा (कुर्‍हा) येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, मुक्ताईनगरात काल शिवसेनेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. ’राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात वेगवान निर्णय आणि गतिमान अंमलबजावणीचा अनुभव सर्वांनाच येत आहे. यातच मुक्ताईनगरात आ. चंद्रकांत पाटील यांनी झपाट्याने विकासकामे केल्याने होऊन हिवरा(कुर्‍हा)येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार पाटील यांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

याप्रसंगी_शोएब तडवी(राष्ट्रवादी उपशाखाप्रमुख),कुरबान तडवी,हरून तडवी,साहिल तडवी,जावेद तडवी,शागीर तडवी,आशिक तडवी,प्रथम येवतकर ,गजानन बावस्कर ,फिरोज तडवी,सोहेल तडवी तसेच अन्य कार्यकर्त्यांचे शिवसेनेत जाहीर स्वागत करत पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला  छोटू भोई (शिवसेना तालुकाप्रमुख),पंकज  राणे (युवासेना जिल्हाप्रमुख),अफसर खान(अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख), दिलीप पाटील,नवनीत पाटील (उपतालुकाप्रमुख), विनोद पाटील(विभाग प्रमुख),बाल मुकुंद पाटील( ज्येष्ठ शिवसैनिक),कुरबान तडवी(गणप्रमुख),अमोल पाटील(जोंधणखेडा सरपंच) ,शैलेश पाटील,गणेश सोनवणे,विष्णू पाटील उपस्थित होते.

Protected Content