बुलढाण्यात खासगी ट्रॅव्हल्स बस उलटली : आठ प्रवासी गंभीर

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील अंजनी गावाजवळ खासगी ट्रॅव्हल्स बस उलटून झालेल्या अपघातात ३० प्रवासी जखमी झाले असून यातील आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.

बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा खाजगी ट्रॅव्हल्स चा अपघात झाला आहे. जिल्ह्यात लोणार तालुक्यातील अंजनी गावाजवळ ही ट्रॅव्हल्स उलटली आहे. यामध्ये झालेल्या अपघातात आठ प्रवासी गंभीरित्या जखमी झाले आहेत. पुण्यावरून साधारण ३० प्रवासी घेऊन ही बस अमरावती कडे जात होती. अंजनी गावाजवळ समोरून ट्रक आडवा आल्याने या खाजगी ट्रॅव्हल्स चा अपघात झाला असल्याच सांगितलं जात आहे. सकाळी साडे ६ वाजता हा अपघात झाला आहे. यात सर्व प्रवासी जखमी झाले असून यातील आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

अपघाताची माहिती मिळताच, गावकर्‍यांनी तात्काळ मदतकार्य करत अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स मधून जखमींना बाहेर काढले आणि तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघाताचा मुद्दा ह्या अपघाताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांचे जीव धोक्यात घालून खाजगी ट्रॅव्हल्स बेभानपणे रस्त्यावर वाहताना पाहायला मिळत आहेत.. त्यावर कुठलेच निर्बंध वाहतूक पोलिसांकडून लावले जात नसल्याचेही बुलढाण्यात चित्र पाहायला मिळतंय..

काही दिवसांपूर्वीच एक जुलै रोजी बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर सिनखेडराजा गावाजवळील पिंपळखुटा येथे एक भीषण अपघात घडला होता. यामध्ये जवळपास २५ जणांचे निष्पाप बळी गेले होते त्यानंतर देखील जिल्ह्यामध्ये विशेषता खाजगी बसेस व कोणतेच निर्बंध दिसत नाही आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये आज सकाळच्या वेळेस एक मोठी दुर्घटना टळली असंच म्हणावं लागेल पण आता तरी प्रशासन विशेषतः काही खाजगी बसेस बाबत रात्रीच्या प्रवासादरम्यान काही निर्बंध लावते का हे पाहव लागेल..

Protected Content