भडगावकरांची मानाची दहीहंडी उत्साहात

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव येथील भाजप व स्व.बापूजी युवा फाउंडेशन तसेच अमोलभाऊ शिंदे युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून भडगावकरांची मानाची दहीहंडी भडगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

 

यावेळी जळगाव लोकसभेचे खा.उन्मेष पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष हभप ज्ञानेश्वर महाराज जळकेकर-पाटील, पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.सभापती तथा संचालक सतीश बाप्पू शिंदे, भाजपा जिल्हाचिटणीस सोमनाथ पाटील, भाजपा माजी सैनिक आघाडीचे समाधान पाटील, भाजपा शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाप्रसंगी भडगाव शहरातील सर्व कार्यक्रमांच्या गर्दीचा रेकॉर्ड तोडत भडगावकर जनतेने प्रतिसाद दिला त्याबद्दल भडगावकर जनतेचे मनस्वी आभार. भारतीय जनता पार्टी भडगाव, स्व.बापुजी युवा फाउंडेशन व अमोलभाऊ शिंदे युवा प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांच्या मेहनतीवर हा कार्यक्रम यशस्वी झाला त्यांचे देखील आभार यावेळी व्यक्त केले.

Protected Content