जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील तरसोद फाट्याजवळ असलेल्या मार्केट जवळून उभ्या ट्रकमधून क्रोम कंपनीचे वाशिंग मशीन चोरून नेल्याची घटना शनिवार ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी गुरुवार ४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला अटक करण्यात आले आहे. मयूर प्रकाश कोळी राहणार कडगाव ता. नशिराबाद असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील तरसोद फाट्याजवळ शनिवार ३० मार्च रोजी दुपारी ३ वाजता ट्रक क्रमांक (एमएच १२ पीक्यू ३४६) हा उभा होता. दरम्यान संशयित आरोपी मयूर प्रकाश कोळी याने ट्रक मधील १० हजार ४९० रुपये किमतीचा क्रोम कंपनीचा वाशिंग मशीन चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. या प्रकरणी ट्रक चालक आतिश शेषराव मोरे वय-२७. रा. खामगाव जि. बुलढाणा याने नशिराबाद पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयित आरोपी मयूर प्रकाश कोळी याच्याविरोधात गुरुवार ४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल युनूस शेख हे करीत आहे