जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील लांडोर खोरी उद्याना समोर पार्कींगला लावलेली आयशर गाडीवरील ५४ हजार रूपये किंमतीचे साऊंड सिस्टीम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी शनिवारी १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, एजाजोद्दिन किफायोद्दि शेख (वय-४८) रा. कस्तुरी हॉटेलच्या मागे, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. साऊंड सिस्टीमचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. १३ जुलै रात्री ११ ते १४ जुलै सकाळी साडे सहा वाजेच्या दरम्यान जळगाव शहरातील मोहाडी रोडवर लांडोर खोरी उद्यानासमोरील मोहित गॅस एजन्सी समोरील मोकळ्या जागेत त्यांच्या मालकीचे साऊंड सिस्टीमचे वाहन आयशर क्रमांक (एमएच ०२ वायए १४०७) गाडी पार्क करून लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी वाहनावरील ५४ हजार रूपये किंमतीचे साऊंड सिस्टीम चोरून नेल्याचे उघकीला आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १५ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.