संभाजी नगरातील सेवानिवृत्त शिक्षिकेचे बंद घरात चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गावाकडे गेलेले सेवानिवृत्त शिक्षीकेच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून १७ हजार रुपये रोख रकमेसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे मंगळवारी १८ सप्टेंबर रेाजी पहाटे ५ वाजता उघडकीला आले.  याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की,  संभाजीनगरातील रहिवासी नीना सोनाजी सावळे हे १३ सप्टेंबर रोजी कुटुंबीयांसह जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घर बंद असल्याची संधी साधून त्यांच्या किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. वरच्या मजल्यावरील खोलीतून या चोरट्याने १७ हजार रुपये रोख रक्कम, २० हजार रुपये किमतीची सोन साखळी, १० हजार रुपये किमतीची अंगठी, आठ हजार रुपये व दुसरे पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे वेढे, पाच हजार रुपये किमतीची चांदीची पैंजण, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे ब्रेसलेट असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.  नीना सावळे हे  सोमवारी १८ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता घरी आले. त्यावेळी त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. त्या वेळी सोन्या-चांदीचे दागिने शोधले असता ते सापडले नाही. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मंगळवारी १९ सप्टेंबर रेाजी दुपारी ३ वाता रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

Protected Content