आयुध निर्माणी येथील शस्त्रागार विभागातून ५ शस्त्रांची चोरी

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव येथील आयुध निर्माणी येथील शस्त्रागार विभागातून अज्ञात चोरट्याने ८ लाख रूपये किंमतीच्या वेगवेगळ्या पाच शस्त्रे चोरून नेल्याची धक्कादायक घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, वरणगाव येथे केंद्रा सरकारचे आयुध निर्माणी असून या ठिकाणी भारतीय सैन्यांसाठी लागणारे शस्त्रे बनविली जातात. आयुध निर्माणी येथील शस्त्रागार विभगाातील एके ४७ सारख्या वेगवेगळी शस्त्रे ठेवण्यात येतात. १९ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी शस्त्रागार विभागातून ८ लाख रूपये किंमतीचे ५ शस्त्रे चोरून नेले. ही घटना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता समोर आली. याप्रकरणी आयुध निर्मार्णीचे कनिष्ठ कार्य प्रबंधक प्रदीपकुमार बाबुराव चव्हाण यांनी बुधवारी २३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव हे करीत आहे.

Protected Content