दीपनगर औष्णिक विद्यूत केंद्रातील अपघातात परप्रांतीय कर्मचारी गंभीर जखमी

दीपनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील औष्णिक विद्यूत केंद्रातील नवीन प्रकल्पात बॉयलरची उभारणीचे काम सुरू असतांना २४ मीटर उंचीवरून कंत्राटी परप्रांतीय कामगार पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी झालेल्या कामगाराला भुसावळ येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

 

औष्णिक विद्यूत केंद्रातील नवीन प्रकल्पात बॉयलरची उभारणी केली जात आहे. त्याचे काम आर.ए. इंटरप्रायजेसच्या कंत्राटी ठेकेदाराच्या माध्यमातून केले जात आहे. दीपनगर औष्णिक विद्यूत केंद्रात कंत्राटदाराकडून सुरक्षिता साधानाचा अभावामुळे अनेकवेळा अपघात हावून अनेकावेळा काहीचा गंभीर दुखापत होते. नवीन प्रकल्पात बॉयलरची उभारणीचे काम सुरू असतांना गुरूवारी २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता एका कंत्राटी परप्रांतीय कामगार हा २४ मीटर उंचीवरून ठेकवलेल्या लोखंडी बीमवर पडल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याला तातडीने खासगी वाहनातून भुसावळातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. सुरक्षिता साधानांच्या अभावामुळे होणाऱ्या अपघाता संदर्भात प्रशानाकडून कोणतीही कारवाई किंवा कोणतीही दखल घेतली नाही.

Protected Content