अमळनेरात २२ शेळ्यांची चोरी ; गुन्हा दाखल

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील टाकरखेडा शिवारातील शेड मधून अज्ञात चोरट्याने ७३ हजार रुपये किमतीचे २२ शेळ्या चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, ज्ञानेश्वर नागराज पाटील वय 49 राहणार टाकरखेडा तालुका अमळनेर जिल्हा जळगाव यांचे टाकरखेडा शिवारात बंदिस्त शेड यांचा गोटा आहे. याठिकाणी बांधलेल्या २२ शेळ्या सुमारे ७३ हजार रुपये किमतीच्या होत्या त्या शेळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ करीत आहे.

 

Protected Content