दुचाकीसह मोबाईल लंपास ; वरणगाव येथील घटना

वरणगाव प्रतिनिधी । शहरातील रामपेठ परिसरातील देशी दारू दुकानासमोरून दुचाकीसह मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, रोशन शहा फत्तु शहा फकीर वय ३६ रा. पिंपळगाव ता. भुसावळ हे कामाच्या निमित्ताने १८ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास वरणगाव येथील रामपेठ परिसरात आले. त्याठिकाणी त्यांनी दुचाकी एमएच 19 डी आर 4231 दुचाकी पार्किंगला लावली होती. साडेसात वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी डिकी ठेवलेला मोबाईल आणि दुचाकी असा एकूण 25 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी वरणगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नागेंद्र तायडे करीत आहे.

 

Protected Content