भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा येथील चौफुलीवर असलेल्या दिपनगर औष्णिक विद्यूत केंद्राच्या मालकीचे असलेले १०० टन राख विनापरवाना चोरी केल्याचे रविवारी २२ जून रोजी रात्री ११ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी २३ जून रोजी पहाटे ४ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्यूत केंद्रातून निघालेली राख ही कुऱ्हा परिसरात ठेवली जाते. या ठिकाणाहून परवानगी देवून ही राख विकली जाते. दरम्यान, रविवारी २२ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास हनुमान विठ्ठल येवले वय ३५ रा. जालना आणि रोशन भुवनेश्वर गोपे वय ३४ रा. झारखंड या दोघांनी विनापरवा कुऱ्हा येथील १०० टन राख विना परवाना चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर औष्णिक विद्यूत केंद्राचे तंत्रज्ञ मोहीत चव्हाण यांनी भुसावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हनुमान विठ्ठल येवले वय ३५ रा. जालना आणि रोशन भुवनेश्वर गोपे वय ३४ रा. झारखंड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हेमंट मिटकरी हे करीत आहे.