Home क्राईम Theft : घरातून सोन्याचे दागिने व रोकड लांबविले 

Theft : घरातून सोन्याचे दागिने व रोकड लांबविले 

0
62
gharfodi
gharfodi

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा परिसरातील शिंदे नगरातील घरातून सोन्याचे दागिने व रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कडोबा त्र्यंबक सुर्यवंशी (वय-४६) रा. शिंदे नगर, पिंप्राळा जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते १७ एप्रिल सकाळी ११ वाजेच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरातून २३ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने आणि १० हजार रूपयाची रोकड असा एकुण ३३ हजाराचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी कडोबा सुर्यवंशी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून बुधवार २० एप्रिल रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहे.


Protected Content

Play sound