रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरातील सावदा रोड लगत असलेल्या राम होंडा शोरुमची मागील बाजूची खिडकी उघडून अज्ञात चोरट्याने २५ हजार रुपयांवर डल्ला मारला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या बाबत वृत्त असे की रावेर शहरातील सावदा रोड लगत असलेल्या राम होंडा शोरुमची मागील बाजूची स्लाईडिंगची खिडकी उघडून चोरट्याने आत प्रवेश केला. कॅश काऊंटरच्या ड्राव्हर मध्ये ठेवलेले २५ हजार रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले. या बाबत शोरुम संचालक अमोल महाजन यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक कल्पेश आमोदकर करीत आहे.