जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात कामानिमीत्त आलेल्या तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. याप्रकरणी रविवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी जिल्‍हापेठ पोलिसांत अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा पेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसी हद्दीतील फातेमानगरात वास्तव्यास असलेल्या मुश्ताक मुक्तार पटेल (वय-२७) हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हा तरुण २० जानेवारी रेाजी रात्री ८ वाजता कामानिमित्त जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दुचाकीने आले होते. दुचाकी (एमएच.१९सीजी.९६२२) मुख्य प्रवेशद्वारा जवळ उभी केली हेाती. काम अटोपुन परत जाण्यासाठी बाहेर रात्री १० वाजता बाहेर आले व दुचाकीजवळ आले. त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी परिसरात शोधाशोध करुनही वाहन सापडली नाही. मुश्ताक पटेल यांनी जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रविवारी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक सलिम तडवी करत आहेत.

 

 

Protected Content