शाहू नगरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शाहू नगरात फार्च्युन फायनान्सच्या पार्किंगमधून चोपडा येथील तरूणाची दुचाकी लांबविल्याची घटना घडील आहे. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील रहिवासी शेख जावेद शेख चाँद (वय-३३) हे गुरूवार २३ जून रोजी त्यांच्या कामानिमित्ताने जळगाव शहरातील शाहू नगर येथील फार्च्युन फायनान्स येथे आले होते. यादरम्यान त्यांची (एमएच१९ बीएल ०१७२) या क्रमाकांची दुचाकी फाननान्सच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास दुचाकी मिळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने शेख जावेद यांनी तीन दोन दिवसानंतर रविवारी २६ जानेवारी रोजी  शहर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Protected Content