तरूणासह त्याच्या आईला लाकडी दांडक्याने मारहाण

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक परिसरात अल्पवयीन मुलीचा साखरपुडा आणि लग्न लावून नका असे समजविण्यासाठी गेलेल्या तरूणासह त्याच्या आईला तीन जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करून दुखापत केल्याची घटना सोमवारी ३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवार ६ जून रोजी रात्री ८ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, चाळीसगाव शहरातील बसस्थानक परिसरात नाना बुधा शिंदे वय ३९ हा तरूण आपल्या आई विमलबाई शिंदे यांच्या सोबत राहतो. दरम्यान, ३ जून रोजी सायंकाळी ७ वाजता भावलाल लाला शिंदे हे आपल्या अल्पवयीन मुलीचा साखरपुडा व लग्न लावून देत असतांना नाना शिंदे हे लग्न लावून नका असे समजविण्यासाठी गेले. याचा राग आल्याने भावलाल लाला शिंदे, मंगलबाई भावलाल शिंदे आणि सिताबाई भावलाल शिंदे सर्व रा. पैठण जि. छत्रपती संभाजी नगर यांनी नाना शिंदे व त्याची आई विमलबाई शिंदे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी गुरूवारी ३ जून रोजी रात्री ८ वाजता चाळीसगाव शहर पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीसात मारहाण करणारे भावलाल लाला शिंदे, मंगलबाई भावलाल शिंदे आणि सिताबाई भावलाल शिंदे सर्व रा. पैठण जि. छत्रपती संभाजी नगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रमेश पाटील हे करीत आहे.

Protected Content