अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला धमकी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरात व्हाट्सअप वरून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीला पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सायबर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील रिंग रोड परिसरात २६ वर्षीय तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १५ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान आज्ञात व्यक्तीने तरुणीच्या व्हाट्सअप मोबाईलवर तिचे फोटो एडिट करून अश्लील पद्धतीने तयार करून तिला व तिच्या मैत्रिणींना पाठवून त्याची बदनामी केली. तसेच फोटो अधिक व्हायरल न करण्यासाठी अज्ञात व्यक्तीने तरुणीला पैशांची मागणी केली. हा प्रकार सहन न झाल्याने तरुणीने जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करत आहे.

Protected Content