तरूणाचा महागडा मोबाईल लांबविला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहू नगर येथे तरूणाचा महागडा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता समोर आली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, सैय्यद वसीम सैय्यद जमील वय २२ रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. खासगी वाहन चालवून तो आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी २७ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सैय्यद वसीम हा शाहू नगरातून पायी जात असतांना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिश्यातील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सैय्यद वसीम याने सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर रात्री ९ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे हे करीत आहे.

Protected Content