Home Uncategorized रेल्वेस्थानक परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली

रेल्वेस्थानक परिसरातून तरूणाची दुचाकी लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वेस्थानक समोरील मोकळ्या जागेवर पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २५ जुलै रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गौरव रावसाहेब निकम (वय-२५) रा. गुरूकुल हौसिंग सोसायटी, एमआयडीसी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी २४ जुलै रोजी दुपारी १ वाजता गौरव हा त्याचा मित्र प्रफुल्ल अनिल पाटील याच्यासोबत जळगाव रेल्वे स्थानकावर दुचाकी (एमएच १९ टी ४७२८) ने आले होते. रेल्वे स्टेशनच्या आवारात मोकळ्या जागी दुचाकी पार्क करून रेल्वेचे तिकीट बुक करण्यासाठी गेले. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. तिकीट बुक झाल्यानंतर दीडवाजता दुचाकीजवळ आले असता त्यांना त्याची दुचाकी जागेवर दिसून आली नाही. परिसरात देखील दुचाकीचा शोध घेतला. सोमवारी २५ जुलै रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.


Protected Content

Play sound