Home Cities जळगाव डांभुर्णी येथील तरूणाची दुचाकी लांबविली

डांभुर्णी येथील तरूणाची दुचाकी लांबविली

two wheelar thift

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील तरुणाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिपक कोळी  (वय-26, रा. डांभुर्णी ता.यावल) हा निलांन्स कंपनीत काला आहे. 12 एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास ते कामावर आला. कंपनीच्या पार्किंगमध्ये दुचाकी लावली, सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पार्किंगला लावलेली (एमएच 19 डीएच ६२२५) क्रमांकाची दुचाकी जागेवर आढळून आली नाही. परिसरात शोधाशोध करून देखील मिळून न आल्याने यावर पोलिसात अज्ञात चोरट्यांनी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार अजिज शेख करीत आहे.


Protected Content

Play sound