धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल
धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव ते गारखेडा रोडवरील युसुफ पठाण यांच्या शेतातील वीटभट्टी येथून वीटभट्टीधारक तरुणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आली. या संदर्भात शनिवारी ६ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिरालाल उत्तम कुंभार (वय-२७ रा.संजय नगर, धरणगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. विटभट्टीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. धरणगाव ते गारखेडा रोडवरील युसूफ पठाण यांच्या शेतात त्यांनी वीटभट्टी सुरू केलेली आहे. २८ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता हिरालाल कुंभार हे त्यांची दुचाकी (एमएच १९ सीएम ४१५६) ने वीटभट्टीवर गेले होते. रात्री तेथेच त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार दुसऱ्या दिवशी २९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आला. दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र दुचाकीबाबत काही माहिती मिळाली नाही. त्यामुळे हिरालाल कुंभार यांनी शनिवारी ६ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील हे करीत आहे.