जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात अज्ञात दोन जणांनी तरूणाला चाकूचा धाक दाखवत जवळील सोन्याची चैन व कानातील बाही असा एकुण ४२ हजारांची मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत रविवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा वाजता अज्ञात दोन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संकेत सुनिल माळी (वय-१९) रा. जोशी पेठ, जुने जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवार ४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता संकेत माळी हा मेहरूण तलावाजवळील एका टेबलाच्या बाकड्याजवळ बसलेला होता. त्यावेळी विना क्रमांकाच्या दुचाकीवरून अनोळखी दोन त्यांच्याजवळ आले. यातील एकान चाकूचा धाक दाखवत संकेत जवळील ४२ हजाराची सोन्याची चैन व कानातील बाही जबरी काढून नेत पोबारा केला. हा प्रकार घडल्यानंतर संकेतने आराडाओरड केली परंतू तोपर्यंत दोघे चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते. रविवारी ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.