जळगावात लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या ३३ जणांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, दुचाकीवर डाबल सिट फिरणाऱ्यांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली. याप्रकरणी ३३ जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पो.स्टे. हद्दीत विनाकारण फिरणारे दुचाकी वाहनावर डबल शिट फिरणारे, तोंडाला मास्क न लावता फिरणारे, चार चाकी वाहनात पुढे फ्रंट साईडला प्रवासी बसविणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, स.फौ. रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, दादासाहेब वाघ, नितीन पाटील, अशोक सनगत, सचिन पाटील, योगेश बारी, सचिन चौधरी, मुकेश पाटील, मुदस्सर काझी, इमरान सैय्यद अशांनी ईच्छादेवी चौकी, राका चौक, रेमंड कॉलनी परिसरात कारवाई केली.

यांच्यावर केली कारवाई
महेंद्र अनिल वराडे, रा- किनगाव, ता. यावल, आतीफ अली सागर अली रा. मास्टर कॉलनी, जळगाव, मोहित यशवंत फालक, रा. बब कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ, इम्रान खान अजीज खान रा. मास्टर कॉलनी, जळगाव, विक्की भगवान कोळी, रा. कांचननगर, शेख साजीद शेख मुंशी, रा. सुबचंद नगर, सुप्रिम कॉलनी, अंकुश सखाराम राजपुत, रा. इंदिरानगर, खेडी बु., ता.जि. जळगाव, योगेश दिलीप तांबट, रा. कांचननगर, रविंद्र काशिनाथ कोळी, रा. वाघोदा रोड, चिनावल, ता. रावेर, राजेश सुरेश जैन, रा. मेहरुण, सुशांत राधेशाम मनियार, रा. गणेशवाडी, राजेंद्र मुरलीधर पाटील, रा. अयोध्यानगर, आसीफ कादिर शेख, रा. रजा कॉलनी, हर्षल गोकुळ भालेराव, रा. आंबेडकरनगर, कोळीपेठ, सलीमशहा रोशनशहा, रा. फातेमानगर, अमीन फरीद तडवी, रा. पहुर, ता. जामनेर, प्रणव पोपट बांडे, रा. अयोध्यानगर, रविंद्र भिमा राठोड, रा. चारठाणा, मुक्ताईनगर, अशोक एकनाथ कर्डिले, रा. अयोध्यानगर, तेजपाल सुरेश नेमाडे रा. जीवन नगर, रामानंद नगर, निलेश शंकर वळसे रा. हनुमाननगर, जळगाव, प्रविण रमेशचंद कौशीक रा. अयोध्यानगर, राजेंद्र मानसिंग कुशवाह रा. कांचननगर, प्रविण डिगंबर काळे रा. आसोदा, ता.जि. जळगाव, किरण विजय पिंपळे रा. म्हाडा कॉलनी, एमआयडीसी, रमजान पिरन मन्यार रा. रिंगणगाव, जि. जळगाव, सलीम शेख कासम शेख रा. अक्सानगर, मेहरुण, विलास दगडु काळे, रा. पेठ, भडगाव, क्रिष्णा सुभाष जांगीड रा. देवेंद्रनगर, जळगाव, संदिप रुपचंद पाटील, रा.मोहाडी, धानोरा, बिक्की अशोक लोहार, रा. सिद्धार्थनगर, रामेश्वर कॉलनी, किशोर रमेश बाघेला, रा. मोहाडी रोड, म्हैसवाडी, दिनेश जयपालसिंग चौधरी, रा. रामेश्वर कॉलनी यांचा समावेश आहे.

३३ जणांवर कारवाई करण्यात आली असून नागरिकांनी विनाकारण न करण्याबाबतचे आव्हान तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याबाबत दुचाकीवर फक्त एकच व्यक्तीस अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचे आवाहन पो.नि. विनायक लोकरे यांनी केले आहे.

Protected Content