तरूणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून दुखापत; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । होळीच्या कार्यक्रमात गाणे वाजविण्याच्या कारणावरून तरूणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून गंभीर दुखापत केल्याची घटना २८ मार्च रोजी रात्री घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, विकास राजू गुमाने (वय-२४) रा. तांबापुरा जळगाव हा आपल्या कुटुंबियांसह राहतात. २८ मार्च रोजी रात्री ८ वाजता घराच्या समोरील अंगणात होळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गल्लीतील तारा गब्बर गुमाने आणि अनमोल गब्बर गुमाने हे राहातात. होळीच्या कार्यक्रमात होळीची गाणे लावा या कारणावरून तारा गुमाने आणि अनमोल गुमाने यांना राग आल्याने दोघांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तर अनमोल गुमाने याने लोखंडी रॉडने विकास गुमाने याच्या डोक्यात हाणली. यात गंभीर दुखपत झाल्याने त्याला खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी विकास गुमाने याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहे. 

 

Protected Content