जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कपाटावर ठेवलेला गरम चहा अंगावर पडल्याने तरूण गंभीररित्या भाजला गेल्याची घटना बांभोरी येथे घडली. जखमी तरूणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंकज शालीक नन्नवरे (वय-२३) रा. बांभोरी ता. धरणगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ट्रॅक्टर चालवून आपला उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी २४ जून रोजी सकाळी ८ वाजता घरी असतांना त्याच्या आईने चहाने भरलेला ग्लास कपाटावर ठेवला होता. दरम्यान पंकज नन्नवरे हा जेवण करण्यासाठी बसत असतांना त्याचा चहाच्या ग्लासला धक्का दाखला. त्यात ग्लासमधील उकळती चहा पाठीवर पडल्याने तो गंभीररित्या भाजला गेला. बांभोरी येथील खासगी डॉक्टराकडून प्राथमोपचार घेतला. दरम्यान, जास्त त्रास जाणवू लागल्याने त्याच्या नातेवाईकाने त्याला जळगावातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपारार्थ दाखल केले आहे. पंकजची प्रकृती बरी असून पुढील उपचार सुरू आहेत.