सचिन तेंडुलकरच्या अंगरक्षकाने केले असे काही. . .

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाने जामनेर या आपल्या मूळ गावी गोळी झाडून स्वत:ची जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, जामनेर शहरातल्या गणपती नगरातील मूल रहिवासी असलेला प्रकाश गोविंदा कापडे ( वय ३७ ) हा जवान सीआरपीएफमध्ये कार्यरत असून सध्या तो सचिन तेंडुलकर याचा अंगरक्षक म्हणून कार्यरत होता. सुटी घेऊन तो गेल्या आठ दिवसांपासून जामनेर येथे आपल्या घरी आलेला होता.

दरम्यान, आज पहाटे प्रकाश कापडे याने गोळी झाडून स्वत:ला संपविले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते. तर त्यांचे पार्थिव हे जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Protected Content