पोलीस ठाण्यात आरडाओरड करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शनिपेठ पोलीस ठाण्यात येत तरुणाने आरडाओरड सुरू केली. मला आत्याचे मुलाने चॉपर मारला , त्याला आताच्या आता अटक करा, नाही तर मी येथे पोलीस ठाण्यात फॅनला लटकुन आत्महत्या करतो, अशी सरळ धमकी ठाणे अंमलदार यांच्या समक्ष दिल्याने शनिपेठ पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. ही आश्चर्यकारक घटना सोमवार, १३ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास शनिपेठ पोलीस ठाण्यात घडली. याप्रकरणी सकाळी १० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की दिनेश दिलीप मांडोळे वय-३०, रा.वाल्मिक नगर, जळगाव हा तरुण १३ मे रोजी मध्यरात्री २ वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात आला. आरडाओरड करत त्याने पोलीस ठाणेच डोक्यावर घेतले. मला आत्याचे मुलाने चॉपर मारला आहे. त्याला आताचे आता अटक करा, नाहीतर मी येथे पोलीस स्टेशनला फॅनला लटकून आत्महत्या करतो, असा दम भरत पोलिसांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, पेट्रोल घेवुन एस.पी. ऑफिस येथे जावून कोणाचा तरी मर्डर करतो, अशी धमकी दिली. त्यानंतर हा तरुण पोलीस कर्मचारी रविंद्र तायडे यांच्या अंगावर धावून आला. अश्लील शब्दप्रयोग करत त्याने पोलीस ठाण्यात बेशिस्त वर्तन करत शासकीय कामात अडथळा आणला. प्रकार कळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून या तरुणाविरुध्द सकाळी १० वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

Protected Content