नर्मदा परिक्रमेला जात असल्याचे सांगून तरूण चार महिन्यांपासून बेपत्ता

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गुरूकुल कॉलनीतील २७ वर्षीय तरूण ही नर्मदा परिक्रमेला जात आहे. त्यामुळे दोन ते तीन महिने फोन बंद असेल असे सांगून बेपत्ता झाल्याचे १० मे रोजी समोर आले आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. महेंद्र समाधान भवरे वय २७ रा. गुरूकूल कॉलनी, जळगाव असे बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे.

रामानंद नगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील गुरूकूल कॉलनीत महेंद्र भवरे हा तरूण परिवारासह वास्तव्याला आहे. २९ डिसेंबर २०२३ रोजी मी नर्मदा परिक्रमेला जात आहे. माझा फोन बंद राहणार आहे. व घरी येण्यास दोन ते तीन महिने लागतील असा मॅसेज करून घरातून निघून गेला. आज महेंद्र भवरे याला जावून चार महिने झाले परंतू तो अद्यापपर्यंत घरी आलेला नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार शुक्रवारी १० मे रोजी दुपारी ४ वाजता पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत पाठक हे करीत आहे.

Protected Content