क्रिकेट घोटाळ्याप्रकरणी फारूक अब्दुल्लांवर ईडीची कारवाई

नवी दिल्ली वृत्तसंस्था । जम्मू-काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांच्यावर क्रिकेट घोटाळ्याप्रकरणी ईडीने कारवाई करत सुमारे ११.८६ कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळ्या प्रकरणी पैशांची अफरातफर केल्याचे आरोप अब्दुल्ला यांच्यावर आहेत. यानुसार त्यांची ११.८६ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

ईडीने फारुख अब्दुल्ला यांच्या ज्या संपत्ती जप्त केल्या आहेत त्यामध्ये त्यांची तीन घरे देखील आहेत. एक गुपकार रोड, दुसरे तहसील कटिपोरा तन्मर्ग आणि तिसरे भटंडी जम्मूमधील आहे. याशिवाय ईडीने श्रीनगरच्या अब्दुल्ला यांच्या व्यावसायिक इमारतींवरही जप्तीची कारवाई केली आहे.

फारुख उब्दुल्ला यांचे पूत्र आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ईडीच्या कारवाईवर आरोप केले आहेत.

 

 

Protected Content