Home Cities जळगाव विद्यापीठात मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी

विद्यापीठात मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी

0
72


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रत्येकाला मतदान करता यावे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शासनाच्या अधिसूचनेनुसार १३ मे रोजी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे.
जळगाव, रावेर, नंदूरबार या मतदारसंघात लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. त्यामुळे विद्यापीठातील प्रत्येक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून १३ मे रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी परिपत्रकाव्दारे दिली आहे.


Protected Content

Play sound