जळगाव प्रतिनिधी । सावदा तालुका रावेर येथील माजी नगरसेवक तथा पत्रकार शाम पाटील यांनी आपल्या मुलीच्या लग्न पत्रिकेतून सामाजिक संदेश व शासकीय योजनेची माहिती सांगून समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे.
आप्तेष्ट आणि स्नेहीजणांना लग्नाचे निमंत्रण देताना मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेच्या माध्यमातून समाज प्रबोधनपर पत्रिका छापली. यामुळे शहरासह समाजात या पत्रिकेची जोरदार चर्चा सुरु आहे. लग्नपत्रिकेवरील अनाठाई खर्च टाळून शासनाच्या विविध प्रकल्पांना प्रोत्साहन देत लग्नपत्रिकेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सावदा तालुका रावेर येथील माजी नगरसेवक ,पत्रकार शाम पाटील व माजी नगराध्यक्षा नीता शाम पाटील असे त्यांचे नाव आहे. यांनी मुलीच्या लग्नातील पत्रिकेत शेतकऱ्या बद्दल अन्नधान्य पिकवेल शेतकरी, तर देशात नांदेल सुख समृद्धी आणि मास हेच राष्टीय कर्तव्य आपले राज्य आणि देश सुरक्षित ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे या सह मुख्यमंत्री यांच्या फोटो सह लोकांमध्ये जनजागृतीचा प्रयत्न केला आहे.
मुलगा असो वा मुलगी दोघांचेही लग्न थाटात व्हावे, असे आई-वडीलांची इच्छा असते. साध्या धाग्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत ‘मेन्यू’ ठरविण्यासाठी कुटूंबातील सदस्य एक ना अनेकदा विचार करतात. लग्नपत्रिका तीन लक्षवेधी स्लोगन
लग्नाची पत्रिका हाती पडल्यानंतर प्रत्येकजण नवीन काय हे पाहण्याचा प्रयत्न करतो. ‘शेतकरी बांधव बद्दल आदर ’ राज्य आणि देश या बद्दल या पत्रिकेत तीन स्लोगनसह दोन लोगोद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे.