महिलेचे बंद घर फोडून रोख रकमेसह दागिने लांबविले

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील चिंतामण मोरया नगर परिसरात महिलेचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा २५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाग्यश्री गोकुळ नन्नवरे वय-३२, रा. चिंतामण मोरया नगर, धरणगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. भाग्यश्री नन्नवरे यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे मंगळसूत्र, चांदीचे दागिने आणि १० हजार रुपयांची रोकड असा एकूण २५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे मंगळवार १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे.

दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर पुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जे.डी. पाटील हे करीत आहे.

Protected Content