चाळीसगाव प्रतिनिधी । धुळे येथे बहिणीला भेटून येते असे सांगून गेलेली ५५ वर्षीय वयोवृद्ध महिला बेपत्ता झाल्याची घटना शहरातील महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथे उघडकीस आली असून याप्रकरणी शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, मंगला जाधव (वय-५५) रा. महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी ता. चाळीसगाव ह्या धुळे येथे बहिणीला भेटून येते असे घरच्यांना सांगून ते २० जूलै रोजी दुपारी १२ वाजता बसने ते निघून गेल्या. मात्र मुलगा सुभाष विक्रम जाधव यांनी सायंकाळी ६ वाजता आईच्या मोबाईलवर फोन केला. परंतु मोबाईल बंद दिसून आला. त्यावर त्यांनी मावशीच्या मोबाईलवर फोन करून आई विषयी विचारपूस केली असता ती आलीच नसल्याचे तिच्याकडून सांगण्यात आले. त्यावर सुभाष विक्रम जाधव यांनी परिसरात व नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली. मात्र मंगला जाधव ह्या मिळून आले नाही म्हणून हरवल्याची खात्री झाल्याने मुलगा सुभाष विक्रम जाधव यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पो.ना. मुकेश पाटील हे करीत आहेत.