अपुर्ण कामाचे पैसे देण्याच्या कारणावरून एकाला बेदम मारहाण

जळगाव प्रतिनिधी । दिलेले काम अपुर्ण केल्यानंतर पैसे मागण्याच्या कारणावरून जोशी पेठेतील ४३ वर्षीय प्रौढ व्यक्तीला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश जगदीश वर्मा (वय-४३) रा. क्वालीटी मेडिकल शेजारी, जोशी पेठ हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. मंगेश वर्मा यांनी त्यांच्या घराच्या बेसमेंटचे वॉटर प्रुफींगचे काम मनोज जगदीश शर्मा (वय-४३) रा. निवृत्ती नगर जळगाव यांना दिले होते. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले काम त्यांनी अर्धवट व अपुर्ण सोडून दिले. सोमवारी २६ जुलै सकाळी १० वाजता मनोज शर्मा हा पुर्ण काम केल्याचे सांगून मंगेश वर्मा यांच्याकडे पैश्यांची मागणी केली. त्यावर मंगेश वर्मा यांनी ‘अपुर्ण काम पुर्ण करून दे’ असे सांगितल्याचा राग आल्याने संशयित आरोपी मनोज जगदीश शर्मा त्याच्यासोबत असलेले सुनिल मोतीलाल लडे (वय-५५) रा. प्रेम नगर आणि दिलीप देवसिंग राजपूत (वय-६७) रा. कल्याण खुर्द ता. धरणगाव यांनी देखील शिवीगाळ व मारहाण करून वर्मा यांच्या अंगावरील शर्ट फाडले. पैसे दिले नाही तर तुझे हातपाय काढून ठेवीन अशी धमकी दिली. मंगेश वर्मा यांनी शनीपेठ पोलीसात धाव घेवून तिघांविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून सोमवारी २६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता  मनोज जगदीश शर्मा, सुनिल मोतीलाल लडे आणि दिलीप देवसिंग राजपूत यांच्याविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content