
सापुतारा (वृत्तसंस्था) सापुताऱ्याला सेल्फी काढण्याच्या नादात नाशिकची एक महिला थेट दरीत कोसळली आहे. सुदैवाने या अपघातात महिलेचा जीव वाचला आहे.
सुषमा मिलिंद पगारे असे या महिलेचे नाव आहे. सेल्फी काढताना सुषमा यांचा पाय घसरला आणि त्या खोल दरीत कोसळल्या. यामध्ये सुदैवाने सुषमा यांचा जीव वाचला आहे. पण त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. सुषमा यांना दरीतून बाहेर काढत उपचारासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.