जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील विठ्ठल पेठ परिसरात राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात कुणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीला आली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याताली आहे. दशरथ प्रेमराज पाटील (५५, रा. विठ्ठलपेठ, जुने जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, दशरथ पाटील हे आपल्या परिवारासह विठ्ठल पेठ परिसरात वास्तव्याला होते. पेंटरचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. सहा महिन्यापुर्वीच त्यांनी विठ्ठल पेठ येथे नवीन घर घेतले. शनीवारी २१ ऑक्टोबर रोजी त्यांची पत्नी कंपनीत कामावर निघून गेल्या. तर मुलगा हा मामाकडे राहतो. दशरथ पाटील यांनी घराच्या मजल्यावर राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. सायंकाळी साडेसहा वाजता त्यांची पत्नी घरी आल्या तेव्हा त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. हे दृष्य पाहून पत्नीने हंबरडा फोडला. यावेळी नातेवाईक व शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी धाव घेवून मृतदेह खाली उतरविला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अमोल विसपूते हे करीत आहे.