फैजपूर येथील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात वेबीनारचे आयोजन

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । शहरातील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात १६ ते १८ डिसेंबर या तीन दिवसीय “सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोग्रॅम” या वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे.

 

आयोजित केलेले वेबीनार हे ट्रेनिंग महाविद्यालयातील तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात स्वतंत्र प्रशिक्षण व प्लेसमेंट सेल कार्यरत आहे. हा सेल विद्यार्थ्यांसाठी नोकरी आणि प्रशिक्षण मिळवण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सहकार्य करण्याचे काम केले जाते. त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या परिसर मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी लागणारे सर्व उपयुक्त प्रशिक्षण या कार्यक्रमाद्वारे दिले जाणार आहे. प्रामुख्याने या प्रशिक्षणामध्ये व्यक्तिमत्व विकास, वेळेचे योग्य नियोजन, ताण व्यवस्थापन, मुलाखतीचे तंत्र, ई-मेल चे योग्य लेखन, समूह चर्चा तंत्र, उद्योजकता विकास संबंधी योग्य माहिती व नेतृत्व गुणवत्ता या विषयांवर योग्य ते मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमात  ह्युरीस्टिक टेक्नो पार्क नाशिक येथील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद भाऊ महाजन, उपाध्यक्ष उल्हास चौधरी, सचिव विजय झोपे यांच्यासह आदी परिश्रम घेत आहे.

Protected Content