टाकरखेडे येथे तलाठी कार्यालयाचे काम निष्कृष्ट!

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर –तालुक्यातील टाकरखेडे येथे तलाठी कार्यालयाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र खालील पाया भरणीतील कॉलम मध्ये मुरूम ऐवजी मातीचा भराव केला जात असल्याने ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरु असून संबंधीत अधिकारी याबाबत कानाडोळा करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
येथील गावात तलाठी कार्यालयासाठी निधी मंजूर झाला आहे. सध्यस्थितीत तलाठी कार्यालयाच्या बांधकामाला सुरुवात झाली असून याकामाची पाया भरणी सुरु आहे. ठेकेदाराने तलाठी कार्यालयाचे कामात खड्डे खोदून लोखंडी कॉलम उभे केले. मात्र या कॉलम मधील खड्यांमध्ये मुरुमाची भर करण्याऐवजी कॉलम उभे करण्यासाठी करण्यात आलेल्या खड्यामधील निघालेली माती पुन्हा त्याच खड्यामध्ये मुरूम न टाकता सर्रास मातीचा वापर केला जात आहे. ग्रामस्थांनी विरोध करूनही ठेकेदाराचा मनमानी पणा आणि संबंधीत अधिकार्याचा मुद्दाम केलेला कानाडोळा यामुळे तलाठी कार्यालयाचे निष्कृष्ट काम होत असल्याने येथील ग्रामस्थांनी आज ता.2 रोजी अमळनेर तहसीलदार मिलिंद वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,ता.27 रोजी या निष्कृष्ट कामाबाबत ग्रामस्थांनी कॉलम करण्यासाठी करण्यात आलेल्या खड्यात मुरूम ऐवजी मातीचा वापर होत असल्याने त्याचे विडिओ, फोटो काढून संबधित अधिकारी संकेत चौधरी यांच्या भ्रमणध्वनी (मोबाईल )वर टाकले होते. याकामात मुरूम ऐवजी माती का टाकण्यात येत आहे. याबाबत संबंधीत अधिकार्याना विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली. कामाची वर्क ऑर्डर विचारली मात्र तीही दाखवली नाही. शासनाने याकामासाठी दिलेला निधीचा सदुपयोग व्हावा आणि काम उत्कृष्ट व्हावे यासाठी निष्कृष्ट होणाऱ्या कामाची दखल घेऊन कारवाई करुण योग्य पद्धतीने काम करण्यात यावे यासाठी येथील ग्रामस्थांनी तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले आहे.टाकरखेडे येथे तलाठी कार्यालयाचे काम निष्कृष्ट!..

Protected Content