गुजरातमधील दाहोद गावातील दुर्दैवी घटना

अहमदाबाद वृत्तसंस्था । गुजरातच्या दाहोदमध्ये शुक्रवारी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष पिऊन आत्महत्या केली आहे. लॉकडाउन सुरु झाल्यापासून हे कुटुंब मोठ्या आर्थिक त्रासात अडकलेले होते असे सांगण्यात . येत आहे

मृताच्या वडिलांनी सांगितले की, मेहुणीकडून सोने घेतल्यानंतर त्यांचा मुलगा सौफी दुधियावाला हा आर्थिक दबावात होता. त्यांनी आर्थिक चणचणीमुळे आत्महत्या केली असावी, असे दाहोदचे पोलीस अधीक्षक हितेश जईसर यांनी सांगितले.

दाहोदच्या सुजाई बाग परिसरात सौफी दुधियावाला (वय ४२), त्याची पत्नी मेजबिल दुधियावाला (वय ३५), मुलगी अरवा (वय १६) आणि दोन मुले जैनब (वय १४) आणि हुसैन (वय ७) हे राहत होते. गुरुवारी रात्री या सर्वांनी विष पिऊन आत्महत्या केली. कुटुंबात फक्त आता सौफी यांचे वडील शब्बीरभाई दुधियावालाच आहेत.

शब्बीरभाई यांनी पोलिसांना सांगितले की, सकाळी त्यांचा मुलगा आणि कुटुंबातील सर्व सदस्य बेशुद्धावस्थेत पडले दिसले त्यांनी तात्काळ ही माहिती शेजाऱ्यांना दिली. हे कुटुंब आर्थिक तंगीचा सामना करत होते . त्यांनी कर्ज घेतले होते. कर्जाचे ओझे वाढल्याने सौफी हा चिंतेत होता . पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करणार आहे.

Protected Content