भुसावळात सिंधी कॉलनीत सट्टा दुकानावर छापा

 

भुसावळ, प्रतिनिधी  । शहरातील सिंधी कॉलनी भागात सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती बाजारपेठच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यावरून दि. ५ मार्च २०२१ रोजी दुपारी सट्टा दुकानावर छापा टाकून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी पोकॉ सुभाष साबळे नेमणूक बाजारपेठ पोलिस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ५ मार्च २०२१ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास गोपनीय महितीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून भुसावळ शहरातील जामनेर रोड वरील सिंधी कॉलनी भागातील आदर्श हायस्कुलच्या पाठीमागे बडा सेवा मंडळ जवळ आरोपी रोहित धर्मेंद्र पारेचाणी ( वय २७ रा. सिंधी कॉलनी) मधील असून हा लोकांकडून बिट आकडेवर पैसे स्वीकारून टाईम बाजार नावाचा सट्टा जुगाराचा खेळ खेळवितांना १५१० रुपये व सट्टा खेळण्याचे साधनासह मिळून आला.  ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुरुन ००९६/२०२१ भाग-५ महाराष्ट्र जुगार प्राधिकरण अधिनियम १८८७ कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एपीआय  धुमाळ,पो. ना. रवींद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पोशि बंटी कापडणे, करतारसिंग परदेशी, सुभाष साबळे, प्रशांत परदेशी, अक्षय चव्हाण, किशोर मोरे यांच्या पथकाने केली.

 

Protected Content