फुटबॉल स्पर्धेत मू.जे. महाविद्यालयाला दुहेरी मुकुट

MJ college jalgaon new

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल (महिला व पुरुष) स्पर्धा १७ नोव्हेंबर रोजी एकलव्य क्रीडांगणावर झाल्या. या क्रीडा स्पर्धेत पुरुष गटात १२ व महिला गटात ४ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेत मू. जे. महाविद्यालयाच्या पुरुष व महिला संघाने अजिंक्यपद पटकावत दुहेरी यश मिळवले.

मू. जे. महाविद्यालयाने पी. ओ. नाहाटा महाविद्यालयाचा पराभव करीत पुरुष गटात विजेतेपद, तर महिला गटात मू. जे. महाविद्यालयाने डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचा पराभव करीत विजेतेपद मिळले. विजयी महिला व पुरुष संघांचा ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. समीर तडवी या खेळाडूने अष्टपैलू खेळ करीत संघास विजेतेपद प्राप्त करून दिले. तर महिला संघात प्राजक्ता पाटील, सुजाता पाटील यांनी अष्टपैलू खेळ केला. या विजयामुळे समीर तडवी, विजय सोनगिरे, अनिकेत मकासरे, लक्ष्मीकांत लोखंडे, राहुल महाजन या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभागीय स्पर्धा नंदुरबार येथे होतील. संघाला प्रा. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांचे मार्गदर्शन मिळाले. अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य उदय कुलकर्णी,डॉ.स.ना.भारंबे,डॉ.सी.पी.लभाणे यांनी विजयी संघांचा गौरव केला.

Protected Content