दीपनगर येथे स्थानिकांचा रोजगार हिरविण्याचा प्रकार : शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

 

भुसावळ, प्रतिनिधी । औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर येथील विद्युत निर्मिती केंद्रात परिसरातील स्थानिकांचा रोजगार हिरावून घेऊन सुरक्षारक्षकांचा ठेका एमएसएफ कंपनी देऊन मोठ्या भ्रष्टाचारास वाट मोकळी करून देण्याचा प्रकार औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर व वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत सुरू असल्याची तक्रार शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रामुळे बऱ्याच लोकांच्या शेतजमिनी संपादित झाल्याने त्यावेळेसपासून आजपर्यंत बेरोजगारीची समस्या आहे. या बेरोजगारीच्या समस्येवर वारंवार आंदोलने करून बऱ्याच गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सुरक्षारक्षकांचा ठेका हा स्थानिकांना देऊन स्थानिक सुरक्षारक्षक ठेवून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न केले होते. परंतु, यातील काही अधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता हा स्थानिकांना मिळणारा रोजगार याचा ठेका एमएस ॲप या राज्यस्तरावरील कंपनीस देण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे सुरक्षा रक्षकाचे काम करणारे जवळपास १५० सुरक्षारक्षक दोन महिन्यापासून बेरोजगारीत जीवन जगत आहेत कोरोनाच्या यामहा मारीत अनेक स्थानिक बेरोजगार झालेले असून त्यामध्ये या १५० बेरोजगारांची भर पडणार आहे. त्यामुळे या सर्वांची कुटुंब उघड्यावर आलेले आहेत. प्रदूषणाचा कहर सोसूनही धुळीचा त्रास सहन करूनही राखेमुळे अनेक दुर्धर आजारांना सामोरे जाऊनही रोजगाराची समस्या सुटत नसेल तर आणि मिळालेला रोजगार जात असेल तर हा जीवघेणा प्रकार आहे. सदर प्रकाराच्या बाबतीत औष्णिक विद्युत केंद्रातील सुरक्षारक्षकांच्या ठेका हा स्थानिक सुरक्षारक्षकांना सामावून घेऊन देण्यात यावा याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऊर्जामंत्री नितीन राउत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले असून निवेदनाच्या प्रती महाजनकोचे चेअरमन संजय खंडारे, एच. आर. विभागाचे व्यवस्थापकीय संचालक पुरूषोत्तम जाधव  या चार विभागाचे संचालक श्रीमंता तसेच सुरक्षा विभागाचे मुख्य अभियंता भारत भूषण दास, वर्षे विद्युत केंद्र दीपनगर चे मुख्य अभियंता व उपमुख्य अभियंता यांना देण्यात आले आहेत. यावर त्वरित निर्णय होऊन स्थानिक मजूरांना दिलासा मिळावा अशी शिवसेनेची मागणी आहे.  शिवसेनेकडे बऱ्याच तक्रारी प्राप्त झाल्याने जर या स्थानिकांना न्याय मिळाला नाही तर शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यासाठी मोठे आंदोलन करतील असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख समाधान महाजन यांनी दिला आहे. स्थानिकांचा रोजगार प्रश्नासंदर्भात लवकरच खालील पदाधिकारी औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाची भेट घेणार आहे. यात तालुकाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा संघटक विलास मुळे, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे व ग्रामीण भागातील सर्व पदाधिकारी यांचा समावेश राहील.  

Protected Content