अंगावर उडी मारल्याचा कारणावरून तिघांनी तरूणाला बदडले

जळगाव प्रतिनिधी । ट्रकच्या टपावर बसलेल्या तरुणाने एका तरुणाच्या अंगावर उडी मारली. याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तीघांनी तरुणास मारहाण केली. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

16 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता तालुक्यातील भोकर गावी ही घटना घडली. 

अधिक माहिती अशी की, सुर्यकांत बळीराम सोनवणे (वय ३५, रा. भोकर, ता. जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सोनवणे हे एका ट्रकमध्ये बसलेले होते. यावेळी टपावर बसलेल्या सागर इश्वर सोनवणे याने त्यांच्या अंगावर उडी मारली. याचा जाब सोनवणे यांनी विचारला. यानंतर सागरसह त्याचे वडील इश्वर सोनवणे व आई छायाबाई यांनी सुर्यकांत सोनवणेंना बेदम मारहाण करुन जखमी केले. या प्रकरणी सुर्यकांत सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तीघांच्या विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापु पाटील तपास करीत आहेत.

Protected Content