जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बारावी परिक्षेच्या निकालात मु.जे.महाविद्यालयाचा निकाल ९६ टक्के लागला असून ९५.८३ टक्के मिळवून वंशिला अग्रवाल ही विद्यार्थीनी महाविद्यालयातून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेचा निकालात स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे. यंदा महाविद्यालयाचा निकाल ९६ टक्के लागला आहे. यात वंशिता सुनिल अग्रवाल ही विद्यार्थीनी ९८५.८३ टक्के मिळवून वाणिज्य शाखासह महाविद्यालयात प्रथम आली आहे. विज्ञान शाखेत खेलेश पाटील याने ९०.६७ टक्के मिळवून प्रथम तर कला शाखेतून सोहा खराटे या विद्यार्थीनीने ९२.५० टक्के मिळवून प्रथम आली आहे. शिवाय मनिष साळुखे, सिकलगर शेख अयान शेख अरीफ यांनी व्यवसाय अभ्यासक्रमात ६१ टक्के मिळविले आहे.
विज्ञान शाखेतील १४ विद्यार्थी, वाणिज्य शाखेतील ८ आणि कला शाखेतील १ विद्यार्थी असे एकुण २३ विद्यार्थ्यांना संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहे. तर वाणिज्य शाखेच्या ११ विद्यार्थी आणि गणित अकाऊंट या विषयात दोघांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहे. यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतूक व अभिनंद केसीई सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य स.ना. भारंबे, शशीकांत वडोदकर, उपप्राचार्या करूणा सपकाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक आर.बी.ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.