नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य सरकारचे खाते वाटप आज जाहीर करण्यात आले असून यात मुख्यमंत्र्यांकडे गृह खात्यासारखी महत्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
आज सायंकाळी मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह व उर्जा खाते देण्यात आले आहे. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते देण्यात आले आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल खात्याची जबाबदारी आली असून चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यालयाचा कार्यभार असणार आहे.
जळगाव जिल्ह्याचा विचार केला असता ना. गुलाबराव पाटील यांना आधीच्याच म्हणजे पाणी पुरवठा व स्वच्छता खाते आलेले आहे. ना. गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण ) व आपत्ती व्यवस्थापन खाते मिळालेले आहे तर, ना. संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी प्रदान करण्यात आलेली आहे.
दरम्यान, आता खाते वाटप झाल्यानंतर पालकमंत्रीपदाच्या जबाबदारीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष करून तिन्ही मंत्र्यांपैकी जळगाव जिल्ह्याची धुरा कुणाकडे येणार ? याबाबत चर्चा सुरू झालेली आहे.