फेकरीकर पवन ‍फिरके यांची कौतुकास्पद कामगिरी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगावच्या भुसावळ तालुक्यातील फेकरी गावातील पवन निना फिरके या तरुणाने भारतीय रेल्वेमध्ये कौतुकास्पद कामगिरी करून नावलौकिक मिळविले. दिनांक २ सप्टेंबर रोजी ट्रेन क्रमांक 17614 पनवेल स्टेशन वर पोहोचल्यानंतर कोच एससी/202714(बी -1) मध्ये 19 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये फरक निदर्शनास आल्यानंतर एक एक्सल खूप जास्त गरम होत असल्याचे पवन फिरके यांच्या लक्षात आले. सदर संकेत हे ग्रीस ज्वलनाचे लक्षात येताच त्यांनी संभावित धोका लक्षात घेता सदर कोच दुरुस्तीसाठी घोषित केला.

त्यांच्या या कामगिरीमुळे मध्य रेल्वेची होणारे नुकसान आणि प्रवाशांची जीवित हानी टळली. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने नवी दिल्ली येथे दिनांक 21 सप्टेंबर रोजी आयोजित 69व्या अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार सोहळ्यामध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पवन फिरके यांना अतिविशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.पवन यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे गावामध्ये सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे

Protected Content