ट्रॅक्टरची बॅटरीची चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडले

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील कल्याणे होळ गावातील एका शेतकऱ्यांच्या खळ्यातील ट्रॅक्टरीची बॅटरीची चोरी करणाऱ्या चोरट्याला पोलीसांनी अटक केली आहे. ही घटना समोर आली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, ललीत व्हनसिंग पाटील वय २३ रा. कल्याणे होळ ता.धरणगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यसाला आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी २० ऑकटोबर रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास त्यांच्या खळ्यात उभे असलेल्या ट्रॅक्टरीची बॅटरी चोरी करण्यासाठी एक चोरटा आला होत. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी आरडाओरड करत त्याचा पकडले. त्यावेळी लहू बालू ठाकरे वय २५ रा. हिंगोणे खुर्द ता.धरणगाव असे नाव सांगितले. त्यावेळी ग्रामस्थांनी ११२ नंबरवर डायल करून धरणगाव पोलीसांना बोलावून घेतले. धरणगाव पोलीस ठाण्यात मोहन जावेर, राजू पाटील., भुषण पाटील, योगेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी लहू ठाकरे या अटक केली. याप्रकरणी ललीत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील हे करीत आहे.

Protected Content