धक्कादायक : महिलेवर अनैसर्गिक अत्याचार; तीन जणांवर गुन्हा

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणारी तीस वर्षीय महिलेला कोल्ड्रिंक्स पाजून तीन जणांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारे तीस वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे सुमारे एक वर्षापूर्वी गोविंदा जगन पवार, श्रीराम जाधव आणि मनीषा कैलास नाईक या तीन जणांनी 30 वर्षीय महिलेला कोल्ड्रिंक्स पाजून जामनेर ते भुसावळ दरम्यानच्या एका गावाजवळ असलेल्या एका हॉटेलवर नेऊन तिच्यावर अनैसर्गिकरित्या अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.यामध्ये अनैसर्गिक अत्याचार करतांना मनीषा हिने विडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केले याबाबत पीडित महिलेने याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोविंद जगन तवर श्रीराम जाधव आणि मनीषा कैलास नाईक यांच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.