गणेश विसर्जनासाठी गेलेले दोघे बेपत्ता; दोन तरूणांना वाचविण्यात यश

भुसावळ प्रतिनिधी । गणेश विसर्जनासाठी तापी नदीच्या पात्रात गेलेले दोन तरूण वेगवान प्रवाहात वाहून गेले असून दोघांना वाचविण्यात मात्र यश आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, गणेश विसर्जनासाठी तापी नदीच्या पात्रात गेलेले दोन तरूण वेगवान प्रवाहात वाहून गेले असून दोघांना वाचविण्यात आले आहे. रात्री उशीरापर्यंत या तरूणांचा शोध सुरू होता.

शहरातील शनी मंदिर वार्डातील गणेश मंडळातील १५ जण हे दिनांक १ सप्टेंबर रोजी सायंकाळी गणेश विसर्जनासाठी झेड.टी.सी.भागातील स्मशान भूमी समोरील रेल्वे पुलाखाली गेले होते. चार जण पाण्यात वाहून जाऊ लागले. यातील धीरज संजय शिंदे (वय २१) व किरण विश्‍वास मराठे (वय २६) या दोघांना वाचविण्यात आले आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर वैभव संजय शिंदे वय २० व उपेंद्र गुलाब चौधरी (वय १९ दोन्ही राहणार शनी मंदिर परिसर) दोघे पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले. रात्री उशीरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.

Protected Content