जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील के-सेक्टर मधील कागद बनवणाऱ्या कंपनीतून अज्ञात चोरट्याने ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
एमआयडीसी पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, सिद्धार्थ अशोक अग्रवाल (वय-३२) रा. शिरसोली रोड, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे एमआयडीसी मधील के-सेक्टरमध्ये कागद बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल तयार करण्याचा व्यवसाय करतात. दरम्यान त्यांनी नवीनच पत्राचे शेड भाड्याने घेतले असून या शेडमध्ये युनिट उभारण्याचे काम सुरू आहे. या युनिट उभारण्यासाठी मशीनला लागणारे सामान इलेक्ट्रिक मोटार, ईलेक्ट्रीक पाण्याची मोटार, ब्रेकर मशीन आदी साहित्य आणून ठेवले होते. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शेडमध्ये सामान ठेवून शटरने बंद केले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यां या शेडमधून इलेक्ट्रिक मोटार, पाण्याची मोटर, इलेक्ट्रिक केबल आणि काँक्रीट ब्रेकर्स असा एकूण ६७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला. दरम्यान सिद्धार्थ अग्रवाल यांनी सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.